सीमावर्ती भागात नक्षली शाळा

नक्षलदलात भरती झालेल्यांच्या मनात व्यवस्थेविषयी व्देष निर्माण करण्यासाठी राज्याच्या सीमावर्ती भागात नक्षली शाळा सुरु करण्यात आली आहे. त्यात शिकवणा-या 2 नक्षल्यांनी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले आहे.

Updated: Feb 25, 2012, 01:59 PM IST

www.24taas.com, गडचिरोली

नक्षलदलात भरती झालेल्यांच्या मनात व्यवस्थेविषयी व्देष निर्माण करण्यासाठी राज्याच्या सीमावर्ती भागात नक्षली शाळा सुरु करण्यात आली आहे. त्यात शिकवणा-या 2 नक्षल्यांनी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले आहे.

जगत सोनू मडावी आणि सोमी उर्फ निर्मला लालू कुळमेथे अशी त्यांची नावं आहेत.  महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातल्या अबुजमाड भागात नक्षलवाद्यांची शाळा भरते.पण शाळेत शिकवणारे शिक्षकच त्या चळवळीला कंटाळून मुख्य प्रवाहात सामील झाले आणि हे भयानक वास्तव समोर आलं आहे.

नक्षलींच्या प्रभावाखाली गडचिरोली जिल्हा वावरत आहे. याठिकाणी नक्षलवादी धुमाकुळ घालत आहेत. यामुळे येथील ग्रामस्थ भयभित जीवन जगत आहेत. मात्र, सरकारच्या उदासिनतेमुळे इथला नागरिक पिचला आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील केवळ घोषणा करत सुटले आहेत. संपूर्ण नक्षलवाद खतम केला जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, याला टिचून नक्षलवाद्यांनी उत्तर दिल्याचे नक्षली शाळांवरून दिसून येत आहे.

संबंधित आणखी  बातमी

नक्षलवाद्यांकडून भामरागड सभापतींची हत्या

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="55085"]