नागपूरकर स्ट्रॉबेरीचे 'चहा'ते

थंडीत वाफाळलेल्या चहाची मजा काही औरच. त्यातच तो फ्लेवर्ड चहा असेल तर रंगत आणखी वेगळीच. नागपूरकरांना सध्या स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या चहाने भुरळ घातली आहे. या स्ट्रॉबेरी चहाचा आस्वाद घेण्यासाठी नागपूरकर ‘टी लॉन्ज कॅफे’त गर्दी करत आहेत.

Updated: Jan 18, 2012, 10:47 AM IST

www.24taas.com, नागपूर

थंडीत वाफाळलेल्या चहाची मजा काही औरच. त्यातच तो फ्लेवर्ड चहा असेल तर रंगत आणखी वेगळीच. नागपूरकरांना सध्या स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या चहाने भुरळ घातली आहे. या स्ट्रॉबेरी चहाचा आस्वाद घेण्यासाठी नागपूरकर ‘टी लॉन्ज कॅफे’त गर्दी करत आहेत.

कडाक्याच्या थंडीत गरमागरम चहा पिणं ही सग्ळ्यांचीच आवडती गोष्ट आहे आणि त्यात आता नागपूरातील चहाबाजांना स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या चहाच्या रुपाने पर्वणीच मिळाली आहे. चहा प्यायला बहाणा लागत नाही मात्र  तरीही नागपूरकर म्हणतात हा चहा प्यायल्यामुळे एनर्जी येते.  हा स्ट्रॉबेरी चहा कुठलाही इसेन्स न घालता स्ट्रॉबेरी वाळवून कुटुन त्याच्या पावडरपासून तयार केला जातो, त्यामुळे त्याची लज्जत औरच आहे. स्ट्रॉबेरी बरोबरच आंबा, रासबेरी, डाळींबं, ऑरेंज या फ्लेवरमध्येही चहा उपलब्ध आहे.

६१ रुपयांपासून ते १५० रूपयांना मिळत असलेला हा फ्लेवर्ड चहा नागपूरकरांच्या पसंतीस उतरला आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर रिलॅक्स होताना सगळ्यांनाच चहाची गरज असते. त्यात असा फ्लेवर्ड चहा तर चहाशौकीनांना एक बहाणाचं मिळाला आहे.