आता तुकडे गडचिरोलीचे!

जिल्हाविभाजनाच्या मागणीचं निवेदन उपविभागीय अधिका-यांना देण्यात आलं. प्रशासकीयदृष्ट्या अतिशय मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचं विभाजन करण्यात यावं अशी इथल्या आदिवासींची मागणी आहे.

Updated: Nov 22, 2011, 01:53 PM IST

झी २४ तास वेब टीम, गडचिरोली

 

गडचिरोली जिल्ह्याच्या विभाजनाच्या मागणीसाठी भजन आंदोलन करण्यात आलं. अहेरी जिल्हा संघर्ष निर्माण कृती समितीकडून हे आंदोलन करण्यात आलं. गडचिरोली जिल्हा प्रशासकीयदृष्टया मोठा आहे. त्यामुळं अहेरी आणिउपविभागातल्या तालुक्यांसह स्वतंत्र जिल्हा निर्माण करावा अशी मागणी आंदोलकांनी केली.

 

यावेळीजिल्हाविभाजनाच्या मागणीचं निवेदन उपविभागीय अधिका-यांना देण्यात आलं. प्रशासकीयदृष्ट्या अतिशय मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचं विभाजन करण्यात यावं अशी इथल्या आदिवासींची मागणी आहे. गडचिरोलीतल्या पाच तालुक्यांमध्ये या आंदोलनाला पाठिंबा वाढतोय