अफगाणी नागरिकाला आधार 'आधार कार्डचा'

गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात अवैधपणे राहणाऱ्या अफगाणिस्तानच्या एका नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. बशीर शाह असं या अफगाणी नागरिकाचं नाव असून त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड सापडल्यानं खळबळ उडाली आहे.

Updated: Jan 9, 2012, 01:05 PM IST

www.24taas.com, नागपूर

गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात अवैधपणे राहणाऱ्या अफगाणिस्तानच्या एका नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. बशीर शाह असं या अफगाणी नागरिकाचं नाव असून त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड सापडल्यानं खळबळ उडाली आहे.

नागपूर पोलिसांनी अटक केलेला अफगाणिस्तानचा बशीर शाह हा ब्लँकेंटचा व्यवसाय करणारा आहे.२००२ ते २००६ या काळात नागपूरात वास्तव्यास होता. त्यावेळी अवैधपणे राहत असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करून अफगाणिस्तानात परत पाठवण्यात आलं. मात्र आता त्याच्याकडे भारतीय नागरिकत्वाची ओळख असलेलं आधार कार्ड सापडल्यानं पोलिसांसमोरही यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

२००६ मध्ये अफगाणिस्तानात पाठवूनही २०१० मध्ये बशीर भारतात पुन्हा परतला. याकाळात त्यानं शासकीय कागदपत्र बनवून घेतली. त्याआधारे पासपोर्ट बनवण्याचाही त्याचा प्रयत्न होता. बशीरच्या हालचालींमधून कुठच्या घातपाताच्या कारवाईत त्याचा सहभाग होता का ? याचा पोलिस शोध घेत आहेत. एका परदेशी नागरिकानं इतक्या सहजपणे आधार कार्ड बनवल्यानं या योजनेच्या पारदर्शकतेबद्दलही आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.