रायगड जिल्ह्यात दरोडेखोरांचे थैमान सुरुच

रायगड जिल्ह्यात दरोड्यांचं सत्र सुरुच आहे. माणगावचे उपसरपंच राजेश मेहता यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकलाय. रिव्हॉल्व्हर आणि चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी साडेसहा लाखांचा ऐवज लुटला

Updated: Feb 8, 2012, 01:04 PM IST

 www.24taas.com,भरत गोरेगावकर- माणगाव

 

रायगड जिल्ह्यात दरोड्यांचं सत्र सुरुच आहे. माणगावचे उपसरपंच राजेश मेहता यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकलाय. रिव्हॉल्व्हर आणि चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी साडेसहा लाखांचा ऐवज लुटला. यापैकी एका दरोडेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. रायगड जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यातली दरोड्याची ही नववी घटना आहे.

 

गेल्या दोन महिन्यात पडलेल्या दरोड्यांमध्ये उरणला दरोडखोरांनी पती-पत्नीला जखमी करुन ३५ लाख रुपयांचा ऐवज लुटला. या प्रकरणात त्यांच्या मतीमंद मुलाला बेडमध्ये दरोडेखोरांनी कोंबले होते. तर कर्जतच्या फार्म हाऊसवर टाकलेल्या दरोड्यात दरोडेखोरांनी साडेतीन लाख रुपयांची रोकड आणि दोन लाख रुपयांचे दागिने लुटले होते. दरोडेखोऱ्यांच्या हल्ल्यात खालापूर पती-पत्नींचा मृत्यू झाला तर पळस्पा इथेही एका व्यक्तीची हत्या करण्यात आली.

 

खालापुरला ग्रामस्थांनी एका आदिवासीला लोकांनी दरोडेखोर समजुन ठार मारलं तर पेझारीला अशाच एका प्रकरणात एका वेडसर व्यक्तीला नाहक प्राण गमवावे लागेल. नवीन पनवेलमध्येही लोकांनी दोन इसमांना दरोडेखोर समजुन ठार मारल्याची घटना घडली. रायगड जिल्ह्यात लागोपाठच्या घटनांनी लोकं भयभीत झाली आहेत.

 

[jwplayer mediaid="43986"]