भाईंदरमध्ये बारबालांना अटक

अल्पवयीन मुलींना देहव्यापार करण्यास प्रवृत्त करणा-या तीन बारबालांना नवघर पोलिसांनी गोल्डन नेस्ट परिसरात अटक केली. हिना छारी, बिंदीया छारी आणि बबली छारी या तीन बारबालांना अटक केली असून या तिघीही अंधेरीतील चार बंगला भागातील रहिवासी आहेत.

Updated: Feb 15, 2012, 11:52 AM IST

www.24taas.com,मिरा-भाईंदर

 

अल्पवयीन मुलींना देहव्यापार करण्यास प्रवृत्त करणा-या तीन बारबालांना नवघर पोलिसांनी गोल्डन नेस्ट परिसरात अटक केली. हिना छारी, बिंदीया छारी आणि बबली छारी या तीन बारबालांना अटक केली असून या तिघीही अंधेरीतील चार बंगला भागातील रहिवासी आहेत.

 

मोबाईलवरुन संपर्क करुन ग्राहकांपर्यंत अल्पवयीन मुली पोहचवण्याचे काम या बारबाला करत असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. या बारबालांवर पीटा कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर दोन अल्पवयीन मुलींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

Tags: