'कल्याणमध्ये अनधिकृत बांधकाम वाढतयं' - महापौर

अनधिकृत बांधकामाचा विळखा कल्याणला फार झपाट्याने पडतो आहे. आणि ही बांधकाम करण्यामध्ये स्थानिक राजकारण्याचाच सहभाग असल्याची कबुली दिली आहे, खुद्द कल्याण डोंबिवलीच्या महापौर वैजयंती घोलप यांनी. घोलप यांनी या प्रकरणी स्थानिक आमदाराचाही वरदहस्त असल्याचा आरोप करत खळबळ माजवून दिली आहे.

Updated: Jan 2, 2012, 10:49 AM IST

झी २४ तास वेब टीम, कल्याण

अनधिकृत बांधकामाचा विळखा कल्याणला फार झपाट्याने पडतो आहे. आणि ही बांधकाम करण्यामध्ये स्थानिक राजकारण्याचाच सहभाग असल्याची कबुली दिली आहे, खुद्द कल्याण डोंबिवलीच्या महापौर वैजयंती घोलप यांनी. घोलप यांनी या प्रकरणी स्थानिक आमदाराचाही वरदहस्त असल्याचा आरोप करत खळबळ माजवून दिली आहे.

जागेची टंचाई आणि गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे गेल्या काही वर्षात चाकरमान्याचा नेक्स्ट आणि फर्स्ट चॉईस हा कल्याण आणि डोंबिवली राहिला आहे. कमी असलेल्या दरामुळे जागेच्या कागदपत्राची खात्री न करता विकत घेतात त्यामुळे अनधिकृत बांधकामाची संख्या ही वाढतच चालली आहे. चाळ माफीयांना आता जमीन कमी पडते म्हणून की काय त्याची नजर आता डोंगरावर पडली. कल्याण पुर्वेतील डोंगर उध्वस्त करुन सर्रास अनधिकृत बांधकामे सुरु आहेत.

या अनधिकृत बांधकामाना नेत्यांचा वरदहस्त असल्याचा, स्थानिकांचा  आरोप होताचं, पण आता या प्रकरणी कल्याण डोंबिवलीच्या महापौर वैजंयती घोलप यानी नेत्याच्या सहभागाची कबुली दिल्याने खळबळ माजली आहे. या अनधिकृत बांधकामान उध्वस्त करण्याची कारवाई सुरु झाल्यावर स्थानिक राजकारणी त्याला विरोध करतात असाही आरोप महापौरानी केला आहे. या प्रकरणी थेट आमदारांचे नाव घेतले गेल्याने या प्रकरणाचे राजकीय पडसाद काय उमटतात याकडे साऱ्याचे लक्ष लागलं आहे.