www.24taas.com, ठाणे
दिवसेंदिवस शहरांची लोकसंख्या वाढत चालली आहे. यात शहरांमध्ये पाणीप्रश्न गंभीर होत चाललाय.. अशा वेळी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा चांगला पर्याय ठरतोय.. ठाण्यात उन्नतीवूड्स सोसायटीनं अशाच हार्वेस्टिंग मधून दरवर्षी सुमारे ६०टक्के पाणी वाचतय.
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर असलेली ही आहे उन्नती वूड्स सोसायटी.. या सोसायटीत 300 फ्लॅट्स असून, यात सुमारे 1000 जण राहतात.. इतकी मोठी सोसायटी असल्यानं पाणी प्रश्न नेहमीचाच..मात्र या पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी तोडगा शोधून काढला तो रेन वॉटर हार्वेस्टिंगचा. घरटी 4000 रुपये खर्च करुन त्यांनी पाणीबचतीचा नवा मार्ग शोधलाय.. रुफ टॉपवर म्हणजेच गच्चीवर साचलेलं पाणी आणि सरफेस वॉटर म्हणजेच जमिनीवर पावसाळ्यात साचणारं पाणी ते साठवून ठेवतायेत.. यातून त्यांना मोठा फायदा होताय.. या साठवलेल्या पाण्याचा वापर, गार्डनिंग, गाड्या धुण्यांसाठी किंवा इतर वापरासाठी करण्यात येतोय.
एका कुटुंबाचं सरासरी दररोजचं ९० लिटर पाणी असं रेन वॉटर हार्वेस्टिंग मधून वाचू शकतं.. तसचं मनपाला 1000 लिटरसाठी 8 ते 10 रुपये मोजावे लागतात, तेही वाचू शकतात.. मे महिन्यात याही सोसायटीला टँकरचं पाणी लागतचं..पण रेन वॉटर हार्वेस्टिंगमधून 50 ते 60 टक्के पाणी वाचू शकतं.हा प्रयोग सर्वच सोसयाट्यांनी करावा, असं आवाहन उन्नतीवूड्सच्या रहिवाशांनी केलय. दिवसेंदिवस पाणी प्रश्न गंभीर होत असताना, सर्व सोसायट्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचं करावं अशी मागणीही करण्यात येतय.
पाहा व्हिडिओ..
[jwplayer mediaid="126946"]
[jwplayer mediaid="126952"]
[jwplayer mediaid="126958"]
[jwplayer mediaid="126962"]
[jwplayer mediaid="126966"]