www.24taas.com, अलिबाग
मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांचा अर्धवट राहिलेला अलिबाग दौरा त्यांनी आज पूर्ण केला. मनसे महानगरपालिकेच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे यांनी त्यांची कार्यशाळा घेतली. दोन दिवसापूर्वीच राज ठाकरे हे आपल्या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार होते. मात्र शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना तातडीने रूग्णालायात दाखल केल्याने त्यांनी आपला दौरा रद्द केला होता.
राज ठाकरे यांनी घेतली अलिबागमध्ये नगरसेवकांची कार्यशाळा घेतली. मात्र पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारताच त्यांनी त्या विषयाला बगल देत इतर विषयांना हात घातला. उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत राज ठाकरे यांना छेडले असता त्यांनी सांगितले की, 'मातोश्री भेटीबाबत मला काहीही बोलायचं नाही', 'मातोश्री भेट ही कौटुंबिक बाब आहे'. असं म्हणत राज ठाकरे मातोश्री भेटीवर बोलणं टाळलं. आणि सोयीस्कररित्या मातोश्री भेटीच्या विषयाला बगल दिली.
तर दुसरीकडे त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 'सिंचनावर विरोधक अजिबात आक्रमक नाही', 'विधानसभेत विरोधकांनी सरकारवर तुटून पडायला हवं', 'माझे आमदार योग्य भुमिका मांडत आहेत'. तर 'मराठी शाळेंच्या मुद्द्याबाबत मी मुख्यमंत्र्याची वेळ घेतली आहे'. असे म्हणत मराठी विषयाला पु्न्हा एकदा हात घातला. 'कोकणाचा विकासासाठी एकत्र या. असे आवाहन देखील राज ठाकरेंनी केले. मात्र दुसरीकडे राज ठाकरेंनी नगरसेवकांची कार्यशाळा ही सप्ततारांकित हॉटेलमध्ये घेतली.