अप्पासाहेबांच्या पुरस्कारासाठी लोटला जनसागर

ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा नागरी सत्कार शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यातल्या कासारवडवली इथं होणार आहे. या कार्यक्रमासाठी १० लाखांहून अधिक दासभक्तांची गर्दी झाली आहे.

Updated: Dec 18, 2011, 07:43 AM IST

झी २४ तास वेब टीम, ठाणे

 

ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा नागरी सत्कार शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यातल्या कासारवडवली इथं होणार आहे. या कार्यक्रमासाठी १० लाखांहून अधिक दासभक्तांची गर्दी झाली आहे. ठाणे महापालिकेनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अप्पासाहेब धर्माधिकारी पहिल्यांदाच ठाण्यात येणार असून ठाणे महापालिकेतर्फे कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

 

दासभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. कासारवडवलीतल्या १०० एकरच्या मोकळ्या जागेत हा कार्यक्रम पार पडतो आहे. बैठक चळवळीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचं रोपटं सर्वात आधी ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांनी लावलं. त्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालं आहे. नानासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अप्पासाहेब धर्माधिकारी त्यांचा वारसा चालवत आहेत. आजवर बैठकीच्या माध्यमातून घराघरात अनेक समर्थशिष्य त्यांनी घडवले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन आज अप्पासाहेबांचा भव्य नागरी सत्कार समारंभ होणार आहे.