औरंगाबादमध्ये चोरांचा कळसाला हात

Updated: Nov 8, 2011, 09:09 AM IST

झी २४ तास वेब टीम, औरंगाबाद

 

औरंगाबादमध्ये चोरांनी चोरीचा कळस गाठलाय. रोज होणा-या घरफोड्या, जबरी चो-या, मोटरसायकल चोरीनंतर चोरांनी थेट मंदिरांचे कळस गाठलंय.  त्यामुळं औरंगाबादची सुरक्षितता धोक्यात आलीय.

 

औरंगाबाद शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झालीय. रोज ३-४ घरफोड्या, भररस्त्यात महिलांचे मंगळसूत्र हिसकावणं, जबरी चो-या, मोटरसायकल चोरी आणि रस्त्यावर लुटण्याचं सर्रास प्रकार घडतायत. एवढं कमी होतं म्हणून की काय, आता देवही चोरांच्या तावडीतून सुटले नाहीत.

 

शहरातील एन-४ भागातल्या हनुमान मंदिर आणि निलकंठेश्वर मंदिराच्या कळसालाच चोरांनी हात घातलाय. ५ ते ७ किलोचे पंचधातूचे हे कळस चोरट्यांनी चोरलेत. मंदिरातील दानपेटीही फोडण्याचा प्रयत्न केलाय.