www.24taas.com, नाशिक
कॉपीराईट कायद्यात बदल करण्याला संसदेनं मंजुरी दिलीय. त्यामुळं गीतकार, संगीतकार यांना दिलासा मिळालाय. नव्या कायद्यामुळं या सगळ्यांना आता रॉयल्टी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. राज्यसभेनं या विधेयकाला आधीच मंजुरी दिली होती. त्यावर मंगळवारी लोकसभेनं शिक्कामोर्तब केलं.
सर्वपक्षाच्या खासदारांनी या बदलाला पाठिंबा दर्शवलाय. लोकसभेत दुरुस्ती विधेयक मांडताना मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी शहनाई वादक बिस्मिल्ला खान यांचं उदाहरण दिलं. एवढ्या मोठ्या कलाकाराला त्यांच्या शेवटच्या दिवसात घरं घेणंही अवघड झालं होतं. याधी निर्माते या कलाकारांना रॉयल्टी देत नव्हते. टीव्ही आणि रेडिओवाल्यांना कोणतंही गाणं प्रसारीत करताना यापुढे गीतकार आणि संगीतकारांनाही रॉयल्टी द्यावी लागणार आहे.