हिमवादळाच्या तडाख्यात नऊ सैनिक मृत्युमुखी

उत्तर काश्मीरातील पर्वतराजीत झालेल्या हिमवादळाच्या दोन दुर्दैवी घटनांमध्ये भारतीय सेनादलाचे नऊ मृत्यूमुखी पडले आहेत.

Updated: Feb 23, 2012, 11:21 AM IST

www.24taas.com,  श्रीनगर

उत्तर काश्मीरातील पर्वतराजीत झालेल्या हिमवादळाच्या दोन दुर्दैवी घटनांमध्ये भारतीय सेनादलाचे नऊ मृत्यूमुखी पडले आहेत. उत्तर काश्मीरातील बंदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ तालुक्यात असलेल्या दावर गावातल्या ब्रिगेड मुख्यालयाला हिमवादळाचा तडाखा अचानक बसला आणि त्यामुळे सैनिकांना बचावाची संधीच मिळाली नाही.

 

श्रीनगरस्थित १५ कॉर्पचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जे.एस.ब्रार म्हणाले की आतापर्यंत बर्फाखालून सहा मृतदेह काढण्यात आले आहेत. पण अनेक सैनिक बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बर्फाखाली अडकलेल्या सैनिकांना बाहेर काढण्यासाठी मोहिम हाती घेण्यता आली आहे.

 

हिमवादळाच्या दुसरा तडाखा गंदरबाल जिल्ह्यातील सोनमर्ग जवळ असलेल्या सेनादलाच्या कॅम्पला बसला, यात एक अधिकारी आणि दोन जवानांचा मृत्यू झाला. हिवादळाच्या फटका गंदरबाल जिल्ह्यातील रामवारी भागालाही बसला त्यात घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं पण रात्रीची वेळ असल्याने जीवितहानी झाली नाही. या भागातले मेंढपाल उन्हाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळेस बकऱ्यांना चरायला घेऊन जातात.

 

मागच्याच आठवड्यात गंदरबाल जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना टळली. हिमवादळामुळे सोनमर्गच्या टुरिस्ट रेझॉर्टच्या मध्य भागातून वाहणारा सिंधच्या पाण्याचा प्रवाही अडवला होता. त्यावेळेस सैन्याच्या मदतीने नियंत्रित स्फोट घडवून पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला होता.

 

 

Tags: