हा कोणता न्याय? विष्ठा आणि मूत्र पाजले

काही दिवसांपूर्वी एका वॉर्डन विद्यार्थीनीला मुत्र पाजले होते. याला काही दिवस होत नाहीत तोवर झारखंडमध्येही अशीच घटना घडली आहे. एका वृद्ध दांम्पत्याला विष्ठा चारण्याचे आणि मूत्र पाजण्याची अमानुष घटना घडली आहे.

Updated: Jul 17, 2012, 03:35 PM IST

www.24taas.com, लतेहार, झारखंड

 

काही दिवसांपूर्वी एका वॉर्डन विद्यार्थीनीला मुत्र पाजले होते. याला काही दिवस होत नाहीत तोवर झारखंडमध्येही अशीच घटना घडली आहे. एका वृद्ध दांम्पत्याला विष्ठा चारण्याचे आणि मूत्र पाजण्याची अमानुष घटना घडली आहे. आणि ती सुद्धा पंचायतने दिलेली ही अमानुष शिक्षा आहे. तालिबान्यांप्रमाणे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारे फतवे काढणार्‍या ‘पंचायतीं’ना देशात ठिकठिकाणी ऊत येऊ लागला आहे.

 

झारखंड राज्यातील तेहार जिल्ह्यात एका वृद्ध जोडप्याला ‘पंचायती’ने विष्ठा खाऊन मूत्र प्राशन करण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना घडली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक क्रांतीकुमार यांनीच हा अमानुष प्रकार उजेडात आणला आहे. ८ जुलै रोजी घडलेल्या या गुन्ह्यात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

 

रॉबर्ट लाकरा (६५) आणि कोलेस्टिना (६०) हे जोडपे जादूटोणा करत असल्याच्या संशयातून गावपंचायतीने हे कृत्य केले. पुरो गावातील गुरेढोरे त्या जोडप्याच्या जादूटोण्यामुळे मरत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचा त्या जोडप्याने पंचायतीसमोर इन्कार केला. त्यानंतर त्या दोघांना विष्ठा चारून मूत्र पाजण्यात आले, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.