www.24taa.com, नवी दिल्ली
स्पेक्ट्रम लिलावासाठी आता आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. यासाठी मुदतवाढ मिळण्यासाठी सरकार सर्वोच्च न्यायलयाला विनंती करणार असल्याचं समजतंय.
स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दिले होते. पण, स्पेक्ट्रम लिलाव करणाऱ्या संस्थेनं नवं वेळापत्रक दिले असून त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच या प्रक्रियेसाठी आणखी तीन महिने लागणार, असा केंद्र सरकारचा कयास आहे. त्यासाठी स्पेक्ट्रम वाटपासाठी मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात करण्याच्या तयारीत आहे. दूरसंचार क्षेत्राशी संबंधित विशेषाधिकारप्राप्त मंत्रिगटाने ही मुदत वाढवून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
.