www.24taas.com, हरिद्वार
सी एस टी स्थानकावरून १० जूनला संगीता या ३ वर्षीयं मुलीला मध्यरात्री एका इसमानं पळवून नेलं होतं. संगीताला पळवून हरिव्दारमध्ये नेण्यात आलं होतं. पण आनंदाची गोष्ट म्हणजे पोलिसांना अपहृत संगीता सापडली आहे. हरिद्वार पोलिसांनी माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांची टीम हरिद्वारला जाणार आहे. संगीता हरवल्यानंतर संगिताच्या परिवाराला ती पुन्हा सापडेल अशी आशा होती. झी २४ तासने दाखवलेल्या बातमीनंतर पोलिसांची सुत्रे फिरू लागली.
मुंबईत येऊन काही तरी कमवू या आशेनं पुष्पा आणि लक्ष्मण परभणी जिल्ह्यातल्या पालम गावातून मुंबईत आले होते. मात्र मुंबईत आपलं पोटचं पोर गमवावं लागेल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. मुंबईत ड्रेनेज सफाईचं काम करून परतण्याच्या मार्गावर असताना हे दाम्पत्य सीएसटी स्थानकावर आलं. देवगिरी एक्सप्रेस सुटल्यानं सकाळच्या तपोवन एक्सप्रेसनं परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
आपल्या पाचही मुलांना घेऊन रात्र सीएसटी स्थानकावर घालवण्याचा निर्णय त्यांना महागात पडला. कारण या दोघांचाही डोळा लागताच एका इसमानं त्यांच्या परिवारातील संगिताला उचलून पोबारा केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात फुटेजमध्ये ही चोरी कैद झाली. आणि त्यानंतर लगेचच पोलिसांना संगीताला शोधण्यात यश आलं आहे.