सरकार सुपर लोकपाल आणू शकत नाही - सिब्बल

लोकपालमध्ये आरक्षण हे घटनेचे उल्लंघन नाही, गुजरातमध्ये गेल्या नऊ वर्षांपासून लोकायुक्त नाही, त्या ठिकाणी भाजपने काय केले आहे, असा सवाल मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी लोकपाल संदर्भात संसदेत सुरू झालेल्या चर्चेत विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले.

Updated: Dec 27, 2011, 04:34 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

लोकपालमध्ये आरक्षण हे घटनेचे उल्लंघन नाही, गुजरातमध्ये गेल्या नऊ वर्षांपासून लोकायुक्त नाही, त्या ठिकाणी भाजपने काय केले आहे, असा सवाल मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी लोकपाल संदर्भात संसदेत सुरू झालेल्या चर्चेत विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले. आम्ही सुपर लोकपाल आणू शकत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

अण्णांच्या माध्यमातून भाजप निवडणुकांमध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मी संसदेला सांगू इच्छितो की भाजपने लोकपालचा विरोध केला तर ते सेन्स ऑफ द हाऊस का उल्लंघन करतील. भाजप नेहमी भ्रष्टाचाराला जवळ  करते आणि दुसऱ्यांवर आरोप करते. भाजप शासित राज्यांमध्ये मुख्यमंत्री लोकायुक्त नियुक्त करतात, तर इथ यांना स्वतंत्र लोकपाल हवे आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे त्या राज्यात कठोर लोकायुक्त आणण्यापासून त्यांना कोण अडवत आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, तेव्हा कर्नाटकाचे उदाहरण भाजपचा चेहरा उघडा पाडत आहे. 

 

सिब्बल म्हणाले, गेल्या वर्षी भाजपने लोकपाल संदर्भात एकही सूचना दिली नाही. यापूर्वी कोणत्या सरकारने इतके महत्त्वपूर्ण विधेयक संसदेत आणले आहे हे मला सांगा. खाद्य सुरक्षा विधेयक, भूमी अधिग्रण विधेयक, शिक्षण अधिकार विधेयक हे सर्व विधेयक आमच्याच सरकारने आणले आहेत.