संसद हल्ल्याला १० वर्ष पूर्ण

संसदेवर झालेला हल्ल्याला आज १० वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे या संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्या रक्षकांना आज संसदभवनात श्रद्धांजली वाहण्यात आली. आज १० वर्ष पूर्ण झाल्यानंतरही गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी ही मागणी सुषमा स्वराज यांनी केली.

Updated: Dec 13, 2011, 07:09 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

संसदेवर झालेला हल्ल्याला आज १० वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे या संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्या रक्षकांना आज संसदभवनात श्रद्धांजली वाहण्यात आली. आज १० वर्ष पूर्ण झाल्यानंतरही गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी ही मागणी सुषमा स्वराज यांनी केली.

१३ डिसेंबर २००१ला संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत. हा हल्ला परतवून लावताना शहिद झालेल्या सुरक्षा रक्षकांना आज संसदभवनात श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान मनमोहनसिंग, राष्ट्रपती प्रतिभा पाटीलही यावेळी उपस्थित होत्या.

दहा वर्षापूर्वी १३ डिसेंबरला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास संसदेवर अतिरेकी हल्ला झाला होता. एम्बेस़डर कारनं आलेल्या पाच अतिरेक्यांनी संसद भवनात घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी अतिरेकी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. यात पाचही अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं. तर ९ सुरक्षा रक्षक शहीद झाले.