लालू प्रसाद यादव एम्समध्ये दाखल

राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादव यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे

Updated: Mar 22, 2012, 04:57 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादव यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.

 

माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव सध्या मधुमेह, उच्च रक्त दाबा तसंच मूत्र विसर्जनातील अडथळ्यांमुळे काल संध्याकाळी ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आल्याचं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं.

 

लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय प्रेमचंद गुप्ता यांनी सांगितलं की उच्च रक्त दाब तसंच अन्य विकारासाठी उपचार चालू असून लवकरच त्यांना आराम पडेल.

 

Tags: