लाच पडली महाग, बंगारु ४ वर्ष तुरूंगात

लाचखोरी प्रकणात दोषी आढळलेल्या भाजपचे माजी अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना टार वर्षांचा तुरूंगवास आणि एक लाख रूपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. बंगारु यांना काल सीबीआयच्या विशेष कोर्टात बंगारू यांना दोषी ठरविले होते.

Updated: Apr 28, 2012, 03:51 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

लाचखोरी प्रकणात दोषी आढळलेल्या भाजपचे माजी अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना चार वर्षांचा तुरूंगवास आणि एक लाख रूपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. बंगारु यांना काल सीबीआयच्या विशेष कोर्टात बंगारू यांना दोषी ठरविले होते.

 

 

आज कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला आहे. बंगारुंना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली  होती.   २००१ साली एका इंग्रजी वेबसाईटनं बंगारु लक्ष्मण यांचं स्टींग ऑपरेशन केलं होतं. शस्त्रास्त्र पुरवठा करणा-या बोगस डिलरकडून बंगारु  लक्ष्मण यांनी लाच मागितली होती. हा भाजपचा मोठा पराभव असल्याची टीका काँग्रेसनं केलीय तर शिक्षा सुनावताना बंगारु  लक्ष्मण यांचं वय लक्षात घ्यावं,  अशी मागणी बंगारुंच्या वकिलांनी केली होती.

 

 

संबंधित आणखी बातमी

 

लाचप्रकरण: बंगारुंना पाच वर्षांची शिक्षा?

लाचखोरी प्रकरणी तत्कालिन भाजप अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना दोषी ठरवण्यात आले आहे. बंगारु यांच्या शिक्षेबाबत कोर्टात चर्चा झाली. बंगारुंना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली आहे.
.
---------------------------

लाचप्रकरणी भाजपचे माजी अध्यक्ष बंगारु दोषी

भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना एक लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या विशेष सीबीआयच्या न्यायालयात उद्या शनिवारी शिक्षेबाबत फैसला होणार आहे. त्यामुळे बंगारू यांना काय शिक्षा होणार याकडे लक्ष लागले आहे.