लाचप्रकरण: बंगारुंना पाच वर्षांची शिक्षा?

लाचखोरी प्रकरणी तत्कालिन भाजप अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना दोषी ठरवण्यात आले आहे. बंगारु यांच्या शिक्षेबाबत कोर्टात चर्चा झाली. बंगारुंना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली आहे.

Updated: Apr 28, 2012, 03:14 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

लाचखोरी प्रकरणी तत्कालिन भाजप अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना दोषी ठरवण्यात आले आहे. बंगारु  यांच्या शिक्षेबाबत कोर्टात चर्चा झाली. बंगारुंना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली आहे.

सीबीआय कोर्टानं त्यांना दोषी ठरवलं असून आज दुपारी अडीच वाजता त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. २००१ साली एका इंग्रजी वेबसाईटनं बंगारु लक्ष्मण यांचं स्टींग ऑपरेशन केलं होतं. शस्त्रास्त्र पुरवठा करणा-या बोगस डिलरकडून बंगारु  लक्ष्मण यांनी लाच मागितली होती. हा भाजपचा मोठा पराभव असल्याची टीका काँग्रेसनं केलीय तर शिक्षा सुनावताना बंगारु  लक्ष्मण यांचं वय लक्षात घ्यावं,  अशी मागणी बंगारुंच्या वकिलांनी केली आहे.

सैन्यासाठी लागणाऱ्या थर्मल बायनोकुलरचा पुरवठा करण्यासाठी या दलालाकडून त्यांनी लाच घेतल्याचे सिद्ध झाले. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 व 9 अंतर्गत दोषी ठरविल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्जसुद्धा फेटाळला. शिक्षा सुनावल्यानंतरच जामीन अर्जावर न्यायालय विचार करेल, असे न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितल्याने लक्ष्मण यांना न्यायालयातून थेट तिहार तुरुंगात नेण्यात आले.