लष्करप्रमुख लाचप्रकरणी राज्यसभेत खडाजंगी

सहाशे दुय्यम दर्जाच्या गाड्या खरेदी करण्यासाठी लष्करप्रमुख जनरल व्ही. के सिंह यानी केलेल्या १४ कोटी रूपयांच्या लाचप्रकरणी आज राज्यसभेत पुन्हा एकदा खडाजंगी झाली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घोषणाबाजी झाली.

Updated: Mar 27, 2012, 04:02 PM IST


www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

सहाशे दुय्यम दर्जाच्या गाड्या खरेदी करण्यासाठी लष्करप्रमुख जनरल व्ही. के सिंह यानी केलेल्या  १४ कोटी रूपयांच्या लाचप्रकरणी आज राज्यसभेत पुन्हा एकदा खडाजंगी झाली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घोषणाबाजी झाली.

 

 

संरक्षणमंत्री ए. के. एन्टोनी यांनी याप्रकरणी प्रत्युत्तर देताना लष्करप्रमुखांनी वर्षभरापूर्वी याबाबत माहिती दिल्याचं कबुल केले.. त्याचवेळी आपण व्ही.के. सिंह यांना संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते,मात्र त्यांनी कारवाई करण्यास नकार दिल्याचं एन्टोनी यांनी म्हटलंय. त्यामुळं १४कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट करणा-या लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांच्या कोर्टात एन्टोनींनी चेंडू टोलावला आहे.

 

 

सहाशे दुय्यम दर्जाच्या गाड्या खरेदी करण्यासाठी आपल्याला १४  कोटींची लाच देऊ केल्याचा आरोप करणारे लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्यास भाजपने सोमवारी विरोध केला होता. पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहांत आज हा मुद्दा उपस्थित करणार आला. लष्करप्रमुखांनी केलेला गौप्यस्फोट सरकारने गंभीरपणे घ्यावा. अन्यथा सरकारची निष्क्रियता देशाला महागात जाईल, असा इशारा भाजप नेते व माजी संरक्षणमंत्री जसवंतसिंह यांनी दिला. भाजपच्या सदस्यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला प्रत्युत्तर देत एन्टोनींनी याप्रकरणी दोषी असणा-यांवर कडक कारवाई होईल, असंही स्पष्ट केलंय. सुमार दर्जाच्या गाड्या खरेदी करण्यासाठी ही लाच देण्यात आल्याचा खुलासा सिंह यांनी केला होता. लष्करप्रमुखांना १४ कोटीची लाच दिल्याचा मुद्दा विरोधकांनी आजही राज्यसभेत चांगलाच ताणून धरला आहे.

 

 

दरम्यान, लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांच्या पाठीशी आपण असल्याची माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी आज मंगळवारी राज्यसभेत दिली.  एका सौद्यासाठी सिंग यांना माजी लष्कर अधिकाऱयाने लाच देण्याचा प्रयत्न केला होता, असेही अँटनी यांनी सांगितले. लाच प्रकरणी माजी लष्कर अधिकारी तेजिंदर सिंग यांचे नाव पुढे येत आहे. या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आजपासून चौकशी सुरू केली आहे.