रेल्वे बजेटची ठळक वैशिष्ट्ये

केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी संसदेत आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प मांडायला सुरवात केली आहे. त्रिवेदींनी रेल्वे सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं आहे. जान है तो जहाँ है हे आमचे ब्रीद वाक्य असेल असं ते म्हणाले

Updated: Mar 15, 2012, 03:30 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी संसदेत आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प मांडायला सुरवात केली आहे. त्रिवेदींनी रेल्वे सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं आहे. जान है तो जहाँ है हे आमचे ब्रीद वाक्य असेल असं ते म्हणाले.

 

येत्या पाच वर्षात रेल्वे अपघात कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. सध्याच्या सुरक्षा उपायांवर आम्ही समाधानी नाही ही त्यांची स्पष्टोक्ती बरंच काही सांगून जाते. सुरक्षिततेच्या कडक उपाययोजनांसाठी रेल्वे सुरक्षा प्राधिकरण स्थापन करणार असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं आहे.

 

रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी पाच लाख ६० हजार कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम रेल्वे हाती घेणार आहे. तसंच रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. पायाभूत सुविधांसाठी अडीच लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सॅम पित्रोडा समितीने तयार केलेल्या आधुनिकतेच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

 

 रेल्वे बजेटमधील ठळक वैाशिष्ट्ये

  1. रेल्वेचा भाड्यात वाढ, २ पैसा प्रति किमी भाडेवाढ
  2. लोकलचा प्रवास प्रति किमी २ पैसे, तर एक्स्प्रेस ३ पैशांनी महागला
  3. स्लिपरचा प्रवास प्रति किमी ५ पैसे तर एसीचा प्रवास १० पैशांनी महागला
  4. एसी २ टियर प्रवास प्रति किमी १५ तर एसी फर्स्ट क्लास ३० पैशांनी महागला
  5. लोकलचे किमान भाडे पाच रुपये तर प्लॅटफॉर्म तिकिट ५ रुपये
  6. सीएसटी-कसारा १ रु. ३४ पैसे,
  7. पनवेल १ रु. २० पैसे महाग,
  8. चर्चगेट-विरार १ रुपये २८ पैशांनी वाढणार
  9. सीएसटी-कल्याण तिकीट १ रू. २५ पैसे रुपयांनी वाढलं
  10. रेल्वे मंत्र्यांच्या भाषणाला सुरूवात
  11. रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देणार
  12. सर्व पक्षांचे दिनेश त्रिवेदींनी मानले आभार
  13. जान है तो जहाँ है, हे आमचे ब्रीद वाक्य
  14. रेल्वेचे अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न
  15. सध्याच्या सुरक्षा उपायांवर आम्ही समाधानी नाही- त्रिवेदी
  16. रेल्वे रिसर्च अँड कॉर्पोरेशनची घोषणा
  17. रेल्वे सुरक्षा प्राधिकरण स्थापन करणार
  18. रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी कटीबद्ध – त्रिवेदी
  19. रेल्वेच्या सुरक्षेसाठी स्पेस सायंटिसची मदत घेणार
  20. रेल्वेमध्ये खासगी क्षेत्राकडून गुंतवणुकीची अपेक्षा
  21. रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी ५.६ लाख कोटी रुपये
  22. अडीच लाख कोटी पायाभूत सुविधांसाठी देणार
  23. आधुनिकेतेचा आराखडा तयार, सॅम पित्रोडाच्या समितीने दिला आराखडा
  24. सीमा भागातील राज्यात रेल्वेचे जाळे पसरविणार
  25. ४८७ नवीन रेल्वे प्रकल्प अजूनही प्रलंबित
  26. पुढच्या पाच वर्षात रेल्वे क्रॉसिंग बंद करणार
  27. रेल्वे मार्ग कमी म्हणून गाड्या वाढविणे अवघड
  28. पुढील १० वर्षात १४ लाख कोटींची आवश्यकता
  29. हाथोंके लकीरोसे जिंदगी नही बनती, हमारा भी कोई हिस्सा है जिंदगी बनाने मैं
  30. ५७४१ मागण्या माझ्यापर्यंत पोहचल्या, लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार – त्रिवेदी
  31. देश के रंगोंमे दौडती है रेल... देश के हर अंग मै दौडती है रेल
  32. मागास विभागांचा रेल्वेच्या माध्यमातून विकास करणार
  33. यंदा ६० हजार १०० कोटींचे रेल्वे बजेट
  34. १९ हजार किमीच्या मार्गांचे पाच वर्षात आधुन