राज्यात तामीळ प्रत्येकाला बंधनकारक- जयललिता

परराज्यांतून आलेल्या आणि तामीळ ही मातृभाषा नसलेल्या विद्यार्थ्यांनाही इयत्ता सहावीपर्यंत तामीळ भाषा शिकणं बंधनकारक असल्याचं तामीळनाडूच्या अण्णाद्रमुक सरकारने आज विधानसभेत घोषित केलं.

Updated: Feb 4, 2012, 09:51 PM IST

www.24taas.com, चेन्नई

 

परराज्यांतून आलेल्या आणि तामीळ ही मातृभाषा नसलेल्या विद्यार्थ्यांनाही इयत्ता सहावीपर्यंत तामीळ भाषा शिकणं बंधनकारक असल्याचं तामीळनाडूच्या अण्णाद्रमुक सरकारने आज विधानसभेत घोषित केलं. आणि या धोरणात अजिबात बदल केला जाणार नाही असं तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी सांगितलं.
काँग्रेसचे आमदार गोपीनाथ यांनी तामीळ भाषा समजणं आणि शिकणं हे इतर राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना कठीण जात आहे अशी तक्रार केली होती. तसंच तामीळ शिकवणाऱ्या शिक्षकही पुरेशा प्रमाणात नसल्याचं ते म्हणाले होते.
यावर मुख्यमंत्री जयललिता यांनी ठणकावून सांगितलं की शिक्षक उपलब्ध नसतील तर असे शिक्षक शोधून काढू. जेणेकरून शिक्षकांचा तुटवडा भासणार नाही. पण तामीळनाडूची राज्यभाषा ही येथील प्रत्येकाला आलीच पाहिजे. तसंच  कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांप्रमाणेच तामीळनाडूतही राज्यभाषाभाषा सर्वांना शिकावीच लागेल असं जयललिता म्हणाल्या.