रश्दींविरुद्ध पुन्हा 'देवबंद' आक्रमक

वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांना भारतात येण्यास इस्लामी मदरसे दारूल उलूम देवबंदने केलेल्या विरोधाला उत्तर देताना म्हटले की मला भारतात यायला मला व्हिसाची गरज नाही.

Updated: Jan 10, 2012, 10:01 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली 

 

वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांना भारतात येण्यास इस्लामी मदरसे दारूल उलूम देवबंदने केलेल्या विरोधाला उत्तर देताना म्हटले की मला भारतात यायला मला व्हिसाची गरज नाही.

 

रश्दी यांनी ट्विटरवर लिहीलं ,”तुमच्या रेकॉर्डसाठी सांगतो, मला भारतात येण्यासठी व्हिसाची गरज नाही.”  रश्दींच्या यात्रेला विरोध करताना देवबंदने म्हटलं होतं की मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या रश्दींचा व्हिसा भारत सरकारने रद्द करावा.

 

भारतीय मूल असणाऱ्या रश्दींचा पासपोर्ट ब्रिटनचा आहे. त्यांच्याकडे पीआयओ (भारतीय वंशाचे व्यक्ती) कार्डही आहे. या महिन्यात रश्दींचा जयपूर येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात गौरव होणार आहे. रश्दी  आपली कादंबरी द सॅटेनिक व्हर्सेस मुळए १९८८पासूनच वादग्रस्त ठरले आहेत. भारतात या पुस्तकाला बंदी घातली होती. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी लेखकाविरुद्ध मृत्यूदंडाचा फतवा काढला होता.

 

जयपूर साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या टीमवर्क्स प्रोडक्शन्सचे संचालक संजय राय यांनी म्हटले आहे की साहित्य मंचावर अभिव्यक्ति स्वतंत्र्य आहे. तेव्हा रश्दींना येण्यास मनाई नसावी.