मुस्लिम आरक्षणाला स्थगिती

निवडणूक आयोगानं केंद्र सरकारच्या मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या निर्णयावर स्थगिती दिली आहे. पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे.

Updated: Jan 11, 2012, 11:28 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

निवडणूक आयोगानं केंद्र सरकारच्या मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या निर्णयावर स्थगिती दिली आहे. पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे.

ओबीसींसाठी असलेल्या २७ टक्के आरक्षणातून मुस्लिमांना आरक्षण देण्यात आलं आहे. ओबीसींना असलेल्या अरक्षणातील ९ टक्के मुस्लिमांना देण्याचं अश्वासन दिलं जात होतं, तर नंतर १३ टक्के आरक्षण देण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली होती.

मागील वर्षी २२ डिसेंबरला आचारसंहिता लागू होण्याच्या दोन दिवस आधी मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयावर राजकीय पक्षांनी आक्षेप नोंदवले होते.

त्याची नोंद घेत अखेर निवडणूक आयोगानं मुस्लिमांना देण्यात आलेल्या आरक्षणावर स्थगिती दिली आहे.