मुख्यमंत्री सोनिया गांधींच्या भेटीला

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेलेत. या भेटीत मुख्यमंत्री मुंबई शहर अध्यक्ष निवडीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. चव्हाण आणि सोनिया यांच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

Updated: Apr 21, 2012, 12:41 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

मुख्यमंत्री पृथ्वीराज  चव्हाण  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला दाखल झाले आहेत. या भेटीत मुख्यमंत्री मुंबई शहर अध्यक्ष निवडीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. चव्हाण  आणि सोनिया यांच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

 

 

विदर्भ आणि मराठवाड्यातील नाराज आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करीत नाराज आमदारांनी बैठक  घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री चव्हाण हटावचा नाराही दिला. दरम्यान, ठाण्यात शिवसेनेशी हात मिळवणी केल्याने राष्ट्रवादीने काँग्रेसवर आगपाखड केली आहे. आघाडी तोडण्याची भाषा करताना काँग्रेसला अल्टीमेटन दिला. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आम्हाला गृहीत धरू नका, असे बजावले होते. त्यानंतर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी काँग्रेसला तंबीच दिली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता जास्त आहे. या सर्वबाबींबाबत सोनियांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

 

 

दरम्यान, भ्रष्टाचाराचा आरोप असलेले कृपाशंकर सिंह यांना पदावरून हटविल्यानंतर मुंबईला मराठीचा चेहरा देण्यासाठी काहींनी लॉबिंग बांधण्यासाठी धडपडही केली. मात्र, मुंबई शहराचे अध्यक्षपद आजही निवडण्यात आलेले नाही. या निवडीसाठी मुख्यमंत्री प्रयत्नशिल असल्याने ते दिल्लीला गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.  तसेच मुख्यमंत्र्यांना शह देण्याऱ्या विरोधकांना चाप लावण्याबाबत चव्हाण राजकीय खेळी करत नाहीत ना, अशीही चर्चा आहे. सोनिया गांधी यांच्या भेटीचा तपशील काँग्रेसकडून समजू शकलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कोणत्या विषयावर चर्चा करतात, याकडे लक्ष लागले आहे.

 

व्हिडिओ पाहा..

 

[jwplayer mediaid="86948"]