मान्सून आला रे आला........

गेली अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करायला लावणार मान्सून अखेर केरळात दाखल झाला आहे. केरळच्या दक्षिण किनारपट्टी भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

Updated: Jun 5, 2012, 03:02 PM IST

www.24taas.com, तिरूअनंतपूरम

 

गेली अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करायला लावणार मान्सून अखेर केरळात दाखल झाला आहे. केरळच्या दक्षिण किनारपट्टी भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

 

तब्बल पाच दिवस उशीरानं दाखल झालेल्या मान्सूननं दक्षिण भागात जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्यानंही झालेला पाऊस मान्सूनचाच असल्याचं म्हटलं आहे. उन्हाच्या झळा सोसणाऱ्या सामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. मान्सून पुढं लवकरच सक्रिय होईल याची प्रतीक्षा लागली आहे.

 

मान्सून केव्हा मुंबई आणि महाराष्ट्रात दाखल होईल याची प्रतीक्षा सगळ्यांना लागली आहे. तसेच गोव्यात मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली. उन्हाच्या काहिलींनी त्रासलेले गोवेकर पावसाच्या सरींनी सुखावले. गेल्या २४ तासात गोव्यात जोरदार पाऊस झाला. हे वातावरण कायम राहिल्यास दोन दिवसात मान्सून गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. अनेक नागरिक रेनकोट, छत्र्यांवरची धूळ झाडत घराबाहेर पडत आहेत.