www.24taas.com, पटना
उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातल्या आसरा गावातील खाप पंचायतीनं दिलेल्या तालिबानी फतव्यापुढे पोलिसांनाही झुकावं लागलं आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन पंचांना पोलिसांनी सोडून दिलय.
आसरा गावच्या खाप पंचायतीनं नुकताच महिलांकरता आणि मुलींकरता तालिबानी फतवा जारी केलाय. या फतव्यानुसार मुलींना बाजारात जाण्यास बंदी घालण्यात आलीय तसच त्यांना मोबाईल वापरण्यासही मनाई केलीय. स्त्रियांनी कायम चेहरा झाकूनच चालण्याची सक्ती खाप पंचायतीनं केलीय. ३६ परिवारांच्या पंचायतीनं हा अजब फतवा काढलाय.
४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिला बाजारात जाणार असतील तर त्यांना सोबत मोबाईल नेता येणार नाही असे आदेश या पंचायतीने दिलेत. या तालिबानी फतव्यानंतर पोलिसांनी पंचायतीच्या दोन पंचांना ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यानंतर संतप्त गावक-यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला अखेर पोलिसांनी शरणागती पत्करून या दोन पंचांना सोडून दिलय.