महागाईचा भडका उडणार!

डॉलरच्या तुलनेत रुपया काल निचांकी पातळीवर घसरल्यामुळे महागाईचा भडका उडण्याचे स्पष्ट संकेत दिसू लागलेत. कच्च्या तेलाची आयात महाग झाल्यामुळे इंधनाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यताए. याचा फटका काल शेअरबाजारालाही बसला.

Updated: May 17, 2012, 03:06 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

डॉलरच्या तुलनेत रुपया काल निचांकी पातळीवर घसरल्यामुळे महागाईचा भडका उडण्याचे स्पष्ट संकेत दिसू लागलेत. कच्च्या तेलाची आयात महाग झाल्यामुळे इंधनाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यताए. याचा फटका काल शेअरबाजारालाही बसला.

 

रुपयाच्या रेकॉर्डब्रेक घसरणीमुळे आयातदारांची चिंता चांगलीच वाढलीए. आयातदार आणि बँकांकडून डॉलर्सची मागणी वाढल्यामुळे रुपयाची चांगलीच घसरण झाली. बुधवारी रुपयाची निचांकी घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी 54.46 इतका घसरला. याआधी 15 डिसेंबर 2011 ला 54.30 पर्यंत रुपया पोहोचला होता.

 

आयात होणार महाग

गेल्या दहा महिन्यांमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 27 टक्के घसरलीए. रुपयाच्या घसरणीमुळे आयातदारांचं मोठं नुकसान होतंय. त्यामुळे परदेशात सामान आयात करणं महाग होणारेए.एका सर्वेक्षणानुसार डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे तेल कंपन्यांवर 9 हजार कोटींचा बोजा पडणारेए. आणि घसरण सुरूच राहिल्यास सरकारवर सबसिडीचा अधिक बोजा पडणार आहे.

 

याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी वाढण्यावर होणार आहे. तसंच रुपयाच्या घसरणीमुळे सोनं-चांदी, इलेक्ट्रॉनिक उत्पादनं, कार आणि अनेक प्रकारची औषधं आयात करणं महाग होणारेए. त्याचप्रमाणे परदेश प्रवास आणि परदेशी शिक्षणामुळेही खिशाला चाट बसू शकते.

 

रुपयाची घसरण, फायदा कुणाला

रुपयाच्या घसरणीमुळे काही क्षेत्रांना फायदाही होतो.आईटी क्षेत्रासाठी रुपयाची घसरण फायदेशीर असते. तसंच ज्वेलरी, टेक्सटाईल तसंच अनेक प्रकारच्या निर्यातीसाठीही फायदा होतो.

 

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="102551"]