भारतीय लष्कर सक्षम - लष्करप्रमुख

भारताचं लष्कर कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असल्याची ग्वाही लष्कर प्रमुख व्ही के सिंह यांनी दिलीय. सध्या सुरू असलेल्या सरकारसोबतच्या वादानंतर पहिल्यांदाच सिंह मीडियासमोर आले. देशानं संरक्षणाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला हवं असंही सिंह म्हणाले.

Updated: Mar 30, 2012, 05:54 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली 

भारताचं लष्कर कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असल्याची ग्वाही लष्कर प्रमुख व्ही के सिंह यांनी दिलीय. सध्या सुरू असलेल्या सरकारसोबतच्या वादानंतर पहिल्यांदाच सिंह मीडियासमोर आले. देशानं संरक्षणाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला हवं असंही सिंह म्हणाले.

संरक्षणसंदर्भात 70 टक्के उपकरणं आपल्याला आयात करावी लागतात. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं ही बाब गंभीर असल्याचंही सिंह म्हणाले. संरक्षण राज्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र त्यांनी लष्करप्रमुखांसमोर येण्याचं टाळलं. त्यामुळं सरकारची अजूनही लष्करप्रमुखांवर खप्पा मर्जी असल्याचं दिसून येतंय.

दरम्यान आज लष्करप्रमुख पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग आणि संरक्षणमंत्री ए के अन्टोनी यांना भेटण्याची शक्यता आहे. पतंप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी लष्करप्रमुखांनी वेळ मागितलाय. गेल्या काही दिवसांपासून लष्करप्रमुख आणि केंद्र सराकर याच्यांत विसंवाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. 14 कोटी रुपये लाच दिल्याचं प्रकरण, त्यानंतर लष्करप्रमुखांनी पंतप्रधानांना दिलेलं पत्र, ते माध्यमाकडे फुटल्याचं प्रकरण या पार्श्वभूमीवर ही भेट होत्येय.

तसंच लष्करप्रमुख आजच सीबीआयकडं आपला जबाब नोंदवू शकतात. टाटा ट्रक्स खरेदी प्रकरणात 14 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लष्करप्रमुख जबाब नोंदवू शकतात.