भंवरी देवी प्रकरणः एक आरोपी शरण

भंवरी देवी अपहरण प्रकरणात उमेश राम या आणखी एका आरोपीने पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. उमेश राम सीबीआयच्या स्वाधिन करण्यात आले आहे. उमेश राम भंवरी देवी अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेला नववा आरोपी आहे.

Updated: Dec 27, 2011, 11:53 AM IST

झी २४ तास वेब टीम, जोधपूर

 

भंवरी देवी अपहरण प्रकरणात उमेश राम या आणखी एका आरोपीने पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. उमेश राम सीबीआयच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

 

उमेश राम भंवरी देवी अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेला नववा आरोपी आहे. गेल्या आठवड्यात सीबीआयने ज्या पाच लोकांच्या नाले आरोपपत्र काढले होते, त्यात उमेशचेही नाव होते. पोलिसी सूत्रांकडून सांगण्यात आलं की राजस्थान पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक गिरीराज मीणा यंच्यासमोर उमेशने आत्मार्पण केलं. गिरीराज मीणा हे सीबीआयला या प्रकरणात मदत करत होते. उमेशची आता सर्कीट हाऊसमध्ये चौकशी करण्यात येत आहे.

 

काँग्रेसचे आमदार महिपाल मदेरणा आणि मलखान सिंग, सोहनराम, बलदेव शाहबुद्दिन परसराम, सहिराम आणि भंवरी देवीचा पती अमरचंद यांना यांपूर्वीच या प्रकरणात अटक करण्यात आलं आहे. आता सीबीआय या प्रकरणातील फरार संशयित बिसनरामचा शोध घेत आहे. भंवरी देवी जोधपूरपासून १२० किमी अंतरावर असणाऱ्या जालीवाडा गावातील उप आरोग्य केंद्रात नर्स म्हणून कार्यरत होती. १ सप्टेंबरपासून ती बेपत्ता आहे.