बेदींचा हवाई घोटाळा, नवीन 18 प्रकरणे समोर

टीम अण्णाच्या सदस्य व माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या मागे जणू शुक्लकाष्ठच लागले आहे. शौर्य पदक विजेत्या किरण बेदींनी एअर इंडियाच्या विमान प्रवास भाड्यात 75 टक्के सवलतीचा लाभ घेत अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी देशभर प्रवास केला.

Updated: Oct 26, 2011, 01:16 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

टीम अण्णाच्या सदस्य व माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या  मागे जणू शुक्लकाष्ठच लागले आहे. शौर्य पदक विजेत्या किरण बेदींनी एअर इंडियाच्या विमान प्रवास भाड्यात 75 टक्के सवलतीचा लाभ घेत अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी देशभर प्रवास केला.

 

[caption id="attachment_3688" align="alignleft" width="300" caption="किरण बेदींचा हवाई घोटाळा"][/caption]

कार्यक्रमांच्या आयोजकांकडून मात्र त्या पूर्ण प्रवास भाडं वसुल करत असत. बेंदींचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच गदारोळ माजला. त्यावर त्यांनी हे पैसे आपल्या स्वंयसेवी संस्थेसाठी आणि जनहितासाठीच वापरले अशी भूमिका मांडली होती. आता हे प्रकरण थोडं निवळत असतानाच अशी आणखीन 18 प्रकरणे बाहेर आली आहेत. त्यांनी केलेल्या विमान प्रवासाचा तपशील देणारी यादीच एका इंग्रजी वर्तमानपत्राने जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

स्वयंसेवी संस्थेच्या निमंत्रणावरून किरण बेदी यांनी तब्बल १२ वेळा परदेशात जाण्यासाठी विमानप्रवास केला. या संस्थांकडून बेदी यांनी बिझनेस क्लासचे भाडे वसूल केले परंतु प्रवास मात्र इकॉनॉमी क्लासने केला. ही बाब उघड होताच किरण बेदी यांचे विमान जमिनीवर आले आणि त्यांनी तफावतीची रक्कम परत करण्याची तयारी दाखवली. दरम्यान या प्रकरणी प्रतिक्रिया देताना किरण बेदी यांनी आपण सर्व विमान प्रवासाचा तपशील दिला असून तफावतीची रक्कमही देणार असल्याचे सांगितले.

 

सूट घेऊन सादर केली पूर्ण बिले

 

१३ मे २००९- इंदूर ते मुंबई विमान प्रवास (आयसी १३४), नंतर मुंबई ते दिल्ली (आयसी ६०५). एकूण भाडे रुपये १०,०२९ (इकॉनॉमी क्लास), बिल सादर रुपये २०,०५४ (बिझनेस), रुपये ६,९६५ (इकॉनॉमी).

 

४ मे २००९- दिल्ली ते मुंबई (आयसी ६५७) व परत दिल्ली प्रवास. एकूण भाडे रुपये १२,५८९ (इकॉनॉमी), बिल रुपये ४०,२०५ (बिझनेस).

 

६ एप्रिल २००९- दिल्ली ते जोता (आयसी ८६५) व पुन्हा परत (आयसी ८६५). एकूण भाडे रुपये १४,३७८ (इकॉनॉमी), बिल रुपये ३९,६४७ (बिझनेस).

 

३१ मार्च २००९- दिल्ली ते पाटणा (आयसी ४०७), नंतर पाटणा ते भुवनेश्‍वर (आयसी ८७८). एकूण भाडे रुपये १२,९१२ (इकॉनॉमी), बिले रुपये १६,०३५ आणि रुपये २६,३८६ (दोन्ही बिझनेस).

 

७ फेब्रुवारी २००९- मुंबई ते दिल्ली (आयसी ८१०). एकूण भाडे रुपये ६,२२३ (इकॉनॉमी), बिल - रुपये २२,४७७ (बिझनेस).

 

३१ जानेवारी २००९- दिल्ली ते कोलकाता (आयसी ४०१), परत दिल्ली (आयसी २६३). एकूण भाडे रुपये १३,१२९ (इकॉनॉमी), बिल रुपये ३५,४१७ (बिझनेस).

 

९ जानेवारी २००९- दिल्ली ते पुणे (आयसी ८४९) आणि परत दिल्ली (आयसी ८५०). एकूण भाडे रुपये १३,५२४ (इकॉनॉमी), बिल रुपये ३७,५१६ (बिझनेस).

 

२४ डिसेंबर २००८- दिल्ली ते मुंबई (आयसी ८८७). एकूण भाडे रुपये ६,३९२ (इकॉनॉमी), बिल रुपये १४,५१६ (बिझनेस).

 

२५ नोव्हेंबर २००८- दिल्ली ते बंगळुरू (आयसी ८०३) व परत दिल्ली एकूण भाडे रुपये १६,४४७ (इकॉनॉमी), बिल रुपये ४४,६५४ (बिझनेस).