झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेच्या रेपोरेटमध्ये .२५ टक्यांनी वाढ करण्यात आल्याने दिवाळीत महागाईत भर पडली आहे.
रिझर्व्ह बँकेचे तिमाही पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. मार्च २०१० पासून रिझर्व्ह बँकेनं १२ वेळा प्रमुख व्याजदरात वाढ केलीय. रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत १३ वेळा व्याज दरात वाढ केली आहे. आता व्याज दर, कार, होमलोन वाढणार आहे.
ऐन दिवाळीच्या वेळी रिझर्व्ह बँक व्याजदरवाढीचा बॉम्ब फोडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वाढीशी तडजोड करून व्याजदरात पाव टक्का वाढ करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. रिझर्व्ह बँक आज अर्धवार्षिक पतधोरण जाहीर केले. अर्थव्यवस्थेचा ढोबळ आढावा घेतांना रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्यांवर व्याजदर वाढीच्या आघाताचे संकेतानुसार बँकेच्या रेपोरेटमध्ये .२५ टक्यांनी वाढ करण्यात आली आहे.