बिहारमध्ये माओवादी अटकेत

बिहारमधील रोहतस जिल्ह्यातील सुअर्वा मानवा गावातून आज शनिवार सकाळी एका कट्टर माओवाद्याला अटक करण्यात आली आहे.

Updated: Jan 7, 2012, 02:51 PM IST


www.24taas.com
 , 
पाटना

 

बिहारमधील रोहतस जिल्ह्यातील सुअर्वा मानवा गावातून आज शनिवार सकाळी एका कट्टर माओवाद्याला अटक करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी  सुअर्वा मानवा गावातील एका ठिकाणी छापा टाकला.पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर हा छापा टाकण्यात आला. कट्टर माओवाद्याला अटक केल्याची माहिती पोलीस अधिक्षक मनू महाराज यांनी दिली. त्याच्याकडून  पोलिसांची लुटलेली एक बंदुक आणि ४० काडतुसे जप्त केली आहेत.

 

अटक करण्यात आलेल्या माओवाद्याच्या चौकशीत त्याचे नाव काशी चौधरी सल्याचे स्पष्ट झाले. चौधरी हा अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता. अनेक नक्षल कारवायांमध्ये त्याचा हात होता.