बाबासाहेबांचे कार्टुनः दोषींवर कारवाई होणार

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वादग्रस्त कार्टुनचा समावेश असलेल्या सगळ्या पुस्तकांचं वितरण त्वरित थांबवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. तसंच या प्रकरणात दोषी असलेल्यांविरोधात कडक कारवाई करण्याचंही आश्वासन सरकारने दिले आहे.

Updated: May 11, 2012, 05:12 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वादग्रस्त कार्टुनचा समावेश असलेल्या सगळ्या पुस्तकांचं वितरण त्वरित थांबवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. तसंच या प्रकरणात दोषी असलेल्यांविरोधात कडक कारवाई करण्याचंही आश्वासन सरकारने दिले आहे. याच मुद्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज दिवसभरात तीन वेळा स्थगित करावं लागलं.

 

सीबीएसईच्या 11 वीच्या पुस्तकात आंबेडकरांच्या कार्टुनवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ झाला.  मायावतींसहित इतर पक्षांच्या नेत्यांनीही हा मुद्दा उचलून धरला. यावर उत्तर देताना मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यांना या कार्टुनबद्दल एप्रिलमध्येच माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एनसीईआरटीला पत्र लिहून याबद्दल स्पष्टीकरणही मागितलं होतं, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.