पाठिंबा काढणार, सरकार करूणांसमोर वाकणार?

पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारवर चोहीबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. विरोधकच नाहीतर युपीएच्या घटक पक्षांनीही सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. डीएमकेचे सर्वेसर्वा करुणानिधी यांनी पेट्रोल दरवाढीवरुन युपीएचा पाठिंबा काढण्याची धमकी दिली आहे.

Updated: May 30, 2012, 12:47 PM IST

 www.24taas.com, नवी दिल्ली

पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारवर चोहीबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. विरोधकच नाहीतर युपीएच्या घटक पक्षांनीही सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. डीएमकेचे सर्वेसर्वा करुणानिधी यांनी पेट्रोल दरवाढीवरुन युपीएचा पाठिंबा काढण्याची धमकी दिली आहे.

सर्वसामान्यांच्या विरोधात सरकार असेल तर आम्ही सरकारमध्ये राहणार नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे. पेट्रोलच्या अन्यायकारक दरवाढीवरुन तृणमूल काँग्रेस आणि डीएमके या पक्षांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. याआधी ममता यांनीही सरकारवर पेट्रोल दरवाढीवरुन नाराजी व्यक्त केली होती. ममता यांच्या तृणमूल काँग्रेस आणि करुणानिधी यांच्या डीएमके पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन पेट्रोलच्या दरवाढीचा निषेध सुरु केला आहे.

त्यामुळं सरकारमध्ये प्रमुख घटक पक्ष असलेल्या ममता आणि करुणानिधी यांच्या या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या आक्रमक भूमिकेनंतर करुणानिधींच्या इशाऱ्यामुळं काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.