पत्नीला अश्लील एसएमएस पाठवल्याबद्दल मित्राची हत्या

आपल्या मित्राच्या हत्त्येप्रकरणी सुमित या २४ वर्षीय तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मित्र सुमितच्या पत्नीला अश्लील एसएमएस करत असल्यामुळे त्याचा खुन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात सुमितला अटक केली आहे .

Updated: Feb 7, 2012, 10:53 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

आपल्या मित्राच्या हत्त्येप्रकरणी सुमित या २४ वर्षीय तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मित्र सुमितच्या पत्नीला अश्लील एसएमएस करत असल्यामुळे त्याचा खुन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात सुमितला अटक केली आहे . शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री देवव्रतच्या मदतीने सुमित याने कारमध्येच रोहित या आपल्या मित्राची हत्या केली होती.

 

सुमित आणि रोहित मित्र होते. सुमित नेहमी रोहितला असं म्हणत चिडवायचा की रोहितच्या पत्नीचे त्याच्या मेव्हण्याशी अनैतिक संबंध आहेत. सुमित शुक्रवारी रात्री एका पार्टीला गेला होता. पार्टीतून येताना तो आपला मित्र देवव्रत याच्यासोबत मद्यपान करत होता. त्याचवेळी त्याला रोहितच्या मोबाइलमध्ये आपल्याच पत्नीबद्दलचा आक्षेपार्ह एसएमएस मिळाला.

 

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, “एसएमएस मिळाल्यापासून सुमितचा मूड बिघडला होता. त्याने देवव्रतला सांगितलं की माझ्या पत्नीला बदनाम करणाऱ्या रोहितचा मला जीव घ्यायचाय. यानंतर दोघेही गावी गेले आणि रोहितच्या घरापाशी आपली गाडी त्यांनी उभी केली. यानंतर सुमित रोहितला गाडीमध्ये घेऊन आला. देवव्रत आधीच ड्रायव्हरच्या सीटवर बसला होता. कारमध्ये बसल्यावर सुमितने आपल्या पिस्तुलीने रोहितच्या डोक्यात गोळी घातली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यानंतर देवव्रत कारच्या बाहेर आला, आणि त्याने रोहितच्या तोंडावर पिस्तुलीने हल्ला केला. नंतर दोघांनी राहितचं शव त्याच्याच घराबाहेर सोडून पळ काढला. ”