www.24taas.com, नवी दिल्ली
देशात स्वच्छतागृहांअभावी ५० टक्के लोक उघड्यावर नैसर्गिक विधी उरकतात. मात्र त्यांच्या खिशात मोबाईल मात्र असतो ही बाब समोर आली आहे. जनगणना अहवालातील तपशीलातून ही माहिती समोर आली आहे.
२४.६६ कोटी घरांपैकी फक्त ४६.९ % घरात स्वच्छतागृहं आहेत. ३२ टक्के जनता फक्त सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करते. उघड्यावर नैसर्गिक विधी करणाऱ्या राज्यात झारखंडच्या जनतेचा पहिला क्रमांक लागतो. इथल्या ७७ टक्के घरात स्वच्छतागृहं नाहीत.
त्याखालोखाल ओरिसा आणि बिहारचा नंबर लागतो. पारंपरिक कारणांसोबत निरक्षरता हे यामागचं प्रमुख कारण असल्याचं सांगण्यात येतं.