www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय राज्यमंत्री मुकुल रॉय यांना आज कॅबिनेटपदी बढती मिळालेली आहे. त्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी सुरू झाला आहे. त्यांच्याकडं रेल्वेखात्याची जबाबादारी दिली जाणार आहे. मुकुल रॉय आता रेल्वेमंत्री पदाचा भार संभाळणार आहे. रेल्वेमंत्री म्हणून त्रिवेदी यांनी भाववाढ केल्याने त्यांना आपलं रेल्वेमंत्री पद गमवावं लागलं आहे
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींची ते जागा घेणार आहेत. रेल्वे बजेटमध्ये भाडेवाढ करण्याची शिक्षा दिनेश त्रिवेदींना भोगावी लागली. संसदेत बजेटवर चर्चा होण्यापूर्वीच त्रिवेंदींना पायउतार व्हावं लागलं. राजीनाम्याबाबत लेखी आदेश दिले तर बघू अशी भूमिका घेणाऱ्या त्रिवेंदींना ममतांच्या हट्टापुढं नमावं लागलं.
ममतांना विश्वासात न घेता भाडेवाढ करणाऱ्या त्रिवेंदींच मंत्रिपद गेलं. त्यामुळं त्य़ांच्या जागी मुकुल रॉय यांना लॉटरी लागली आहे. दरम्यान त्रिवेंदीना हटवायला भाग पाडून ममता बॅनर्जींनी आता रेल्वे भाडेवाढ मागे घेण्यासाठी केंद्र सरकावरचा दबाव वाढवला आहे. त्यामुळं सकारची पुन्हा एकदा कोंडी होण्याची शक्यता आहे. ममतांपुढं सरकार पुन्हा एकदा झुकलेलं आहे.