देशात अस्थिरता पसरवण्याचा कट - मोदी

आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांबाबत केंद्र सरकारनं ‘शून्य सहिष्णुता नीती’चा अवलंब करायला हवा, असं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. काल पुण्यात झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलंय.

Updated: Aug 2, 2012, 06:24 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद

आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांबाबत केंद्र सरकारनं ‘शून्य सहिष्णुता नीती’चा अवलंब करायला हवा, असं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. काल पुण्यात झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलंय.

‘पुण्यात झालेल्या स्फोटांमागे कुणाचा हात आहे, हे शोधून काढण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलायला हवेत. मला खात्री आहे की, दहशतवादी कारवायांचं कुणीही समर्थन करणार नाही तसंच या कारवाया थांबवण्यासाठी सरकार गंभीर दखल घेईल अशी माझी अपेक्षा आहे’, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

पुणे येथील जंगली महाराज रोडवर बुधवारी रात्री कमी तीव्रतेचे चार स्फोट झाले. यावरुन अजूनही भारतावर अतिरेक्यांची पकड असल्याचं दिसून येतं, असं मोदी यांनी म्हटलंय. ‘पुण्यात झालेला हल्ला हा गंभीर स्वरुपाचा आहे. रक्षाबंधनच्या एक दिवस आधी आणि नवीन केंद्रीय गृहमंत्री पदभार स्विकारणार आसल्याचं औचित्य साधून हा हल्ला करण्यात आला. यावरुन स्पष्ट होतं की, देशात दहशत पसरविणे आणि अस्थिर करणे हाच यामगचा हेतू आहे, असं मोदींना वाटतंय.

.