झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसात वक्तव्य करून चर्चेत राहायचं असंच ठरवले आहे्. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राबद्दल केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच भोवलं आहे. कारण की, त्यानंतर सगळ्या स्थरातून त्यांचावर टीका होत होती, ‘कब तक पंजाब जाकर मजदुरी करोगे? कब तक महाराष्ट्र जाकर भीक मांगोगे?’ अशी वादग्रस्त विधाने करणारे राहुल गांधी यांनी पुन्हा मुक्ताफळे उधळली आहेत. ‘मी भिकार्याला विचारतो, कुठून आला? कुठला तू? तेव्हा तो म्हणतो, यूपीतून आलो...’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी आज केले.
फुलपूर येथील सभेतील वादग्रस्त वक्तव्यावर आपण ठाम असल्याचे राहुल गांधींनी आज बाराबंकी येथील रामनगरच्या सभेत सांगितले. मी ‘कडवा सच’ बोलतो. माझ्या विधानाला अनेकांनी विरोध केला; पण मी सत्य परिस्थिती सांगितली आहे. राजकीय नेत्यांनी आपल्या गाडीच्या खिडक्यांच्या काचा खाली करून जरा आजूबाजूला बघावे. दिल्लीत रस्त्यावर मी जेव्हा भिकारी पाहतो, तेव्हा काच खाली करून विचारतो, कुठून आला? तेव्हा भिकारी म्हणतो, उत्तर प्रदेशातून. हे वास्तव असल्याचे राहुल म्हणाले.