जगनमोहन रेड्डींसाठी आंध्रा बंद

वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले. जगनमोहन यांच्या अटकेनंतर वायएसआर काँग्रेसनं आंध्र बंदची हाक दिली.

Updated: May 28, 2012, 08:48 PM IST

 www.24taas.com, हैदराबाद

 

वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले. जगनमोहन यांच्या अटकेनंतर वायएसआर काँग्रेसनं आंध्र बंदची हाक दिली. जगनमोहन यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

 

त्यामुळं बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्यात आलं. शिवाय आंध्रप्रदेशात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जगनमोहन यांचा प्रभाव असलेल्या कडप्पा जिल्ह्याला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं. बेहिशेबी संपत्ती प्रकरणी खटल्यात जगनमोहन यांना अटक झाली.

 

जगनमोहन यांची सीबीआयनं तीन दिवस कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या १८ जागा आणि लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होते आहे, त्यापूर्वी ही अटक झाल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.