www.24taas.com, बंगळुरू
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी तूर्त पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलंय. आपण भाजपतच राहणार असल्याचं सांगत येडियुरप्पांनी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांना मात्र टार्गेट केलंय. या संकटाला मुख्यमंत्री म्हणून गौडा हेच जबाबदार असल्याचं सांगत त्यांनी गौडा यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलीयं. आपल्या पाठिशी आमदार असल्याचा दावा येडियुरप्पांनी केलाय. भाजप नेते अनंतकुमार यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडलंय. कर्नाटकात पुढच्या वर्षी म्हणजे 2013 साली विधानसभा निवडमुका होणार आहेत. अशा काळात येडियुरप्पांचे हे बंड मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यापेक्षा, राज्यात राजकीय वर्चस्व राखण्यासाठी महत्त्वाचं आहे.
जमीन गैरव्यवहारप्रकरणी जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर येडियुरप्पांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले तेव्हा त्यांना ना पक्षश्रेष्ठींनी हिंमत दिली, ना राज्याचे मुख्यमंत्री सदानंद गौडा त्यांच्यामागे ठामपणे उभे राहिले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार या काळात येडियुरप्पांशी भाजपच्या कोणत्याही बड्या नेत्यानं साधी चर्चाही केली नाही.. याच कारणामुळे येडियुरप्पांनी सोनिया गांधींचं कौतुक करत, अडचणीच्या काळात काँग्रेस नेते एकमेकांना मदत करतात, असं भाजपला सुनावलं. जुलै 2011 मध्ये येडियुरप्पा यांच्या सहंमतीनेच सदानंद गौडा मुख्यमंत्री झाले, आणि आता तेच सदानंद गौडा येडियुरप्पांना विश्वासघातकी वाटू लागलेयेत.