उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात ४ फेब्रुवारीला होणारं मतदान पुढं ढकलण्यात आलं आहे. निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. ४ फेब्रुवारीला मतदान होणार होतं.
मात्र ४ फेब्रुवारीला ईद असल्यानं मतदान पुढं ढकलण्यात आलं आहे. मतदानाच्या तारखा मात्र जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. लवकरच पहिल्या टप्प्यातल्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. लखनौमध्ये दोन दिवसांची आढावा बैठक झाली.
या बैठकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी ४ फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातलं मतदान घेऊ नये अशी मतं मांडली होती. ४ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशातल्या साठ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार होतं. याच अनुषंगानं पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीची अधिसुचनाही लागू करण्यात येणार नाही. उत्तर प्रदेशात एकूण सात टप्प्यात विधानसभेचं मतदान होणार आहे