www.24taas.com, मुंबई
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज १७ हजार ५८ पूर्णांक ६१ अंशावर बंद झाला. त्यात ६३ अंशाची घट पहायला मिळाली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक आज ५ हजार १७८ पूर्णांक ८५ अंशावर बंद झाला त्यात १५ पूर्णांक ९० अंशाची घट झाली. सकाळी बाजार खुला झाल्यानंतर काही मिनिटातचं बाजार १७ हजार पातळीच्या खाली गेला.करकायदयांमधल्या प्रस्तावित बदल आणि त्यामुळे बाजारात येणाऱ्या संभाव्य भांडवलाबाबतची अनिश्चितता, यामुळे बाजार १७ हजार पातळीच्या खाली गेला.
आज दिवसभरात बाजार कधी १७ हजार पातळीच्या वर तर कधी खाली हेवकावे खात होता. शेवटी तो १७हजार ५८ वर स्थिरावला. अनिश्चततेच्या वातावरणात हेविवेट रिलायन्समध्ये शेअऱमध्ये किंचितशी वाढ पहायला मिळाली. भांडवली वस्तूंच्या उत्पादक कंपन्या, भेल आणि एल एण्ट टीच्या स्टॉक्समध्ये घट पहायला मिळाली. मेटलच्या किंमती उतरल्यामुळे मेटल स्टॉक्स घसरले होते. बजेटमध्ये उत्पादन शुल्क वाढवल्यामुळे वाहनांच्या किंमती वाढून, मागणी कमी होण्याच्या भीतीनं ऑटो स्टॉक्समध्ये मंदी होती.
अमेरिकेनं एच १ बी व्हीसा फीमध्ये पुढच्या आर्थिक वर्षापासून वाढ करणाच्या निर्णयामुळे आयटी कंपन्यांचे स्टॉक्स घसरलेत.आज जिंदाल स्टील, टाटा पॉवर, हिरो मोटोकॉर्प, विप्रो आणि ओनजीसी या कंपन्यांचे शेअर्स वधारलेत. तर लार्सन, इन्फोसिस, टीसीएस, भारती एअरटेल, आणि भेल या कंपन्यांचे शेअर्स घसरलेत.