सांगलीमध्ये प्रतिष्ठेची झेडपी निवडणूक

सांगली जिल्हा परिषद आणि १० पंचायत समित्यांसाठी जिल्ह्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. सांगलीत जिल्हा परिषदेचे ६२ गट आणि पंचायत समितीचे १२४ गण आहेत.

Updated: Feb 7, 2012, 01:38 PM IST

www.24taas.com, सांगली

सांगली जिल्हा परिषद आणि १० पंचायत समित्यांसाठी जिल्ह्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. सांगलीत जिल्हा परिषदेचे ६२ गट आणि पंचायत समितीचे १२४ गण आहेत.

यापैकी जिल्हापरिषदेच्या आणि पंचायत समितीच्या एका जागेवर एक-एक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणूकीत १५ लाख ७६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काट्याची लढत आहे. राष्ट्रवादीकडून गृहमंत्री आर.आर.पाटील आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील तर काँग्रेसकडून पतंगराव कदम आणि केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतिक पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

या निवडणुकीत राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यानी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यानीही आपला मतदानाचा हक्क बजावला.