'हॅलो जयहिंद'ला सेंसॉरची कात्री ?

तृप्ती भोईर निर्मित 'हॅलो जयहिंद' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला असला तरी हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकेल अशी भीती तृप्ती भोईर यांना वाटतेय. वास्तव घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमामुळे या समाजामध्ये चीड निर्माण होऊ शकते.

Updated: Nov 14, 2011, 04:02 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

तृप्ती भोईर निर्मित 'हॅलो जयहिंद' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला असला तरी हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकेल अशी भीती तृप्ती भोईर यांना वाटतेय. २६/११ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निरपराध कुटुंब उध्वस्त झाली, याच दहशतवादी हल्ल्याचं चित्रण लवकरच आपल्याला 'हॅलो जयहिंद' या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे.

 

वास्तव घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमाला लेखनाचीही चांगलीच धार देण्यात आलीय. त्यामुळे या सिनेमातून समाजामध्ये चीड निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकण्याची भीती या सिनेमाची निर्माती आणि अभिनेत्री तृप्ती भोईर यांना वाटतेय. मात्र या सिनेमामध्ये खरंच काही आक्षेपार्ह आहे की हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट ठरतो हे लवकरच कळेल.