सलमानचा 'शेरखान' असेल 'रा.वन'पेक्षा महाग

सलमान खानचा आगामी 'शेरखान' नामक सिनेमा हा बॉलिवूडमधील आत्तापर्यंतचा सर्वांत महागडा सिनेमा बनणार आहे. सोहेल खानची निर्मिती असलेल्या या सिनेमाच्या फक्त व्हिज्य़ुअल आणि ऍक्शन इफेक्ट्सवरच सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.

Updated: Jun 17, 2012, 10:14 PM IST

www.24taas.com, मुंबई

सलमान खानचा आगामी 'शेरखान' नामक सिनेमा हा बॉलिवूडमधील आत्तापर्यंतचा सर्वांत महागडा सिनेमा बनणार आहे. सोहेल खानची निर्मिती असलेल्या या सिनेमाच्या फक्त व्हिज्य़ुअल आणि ऍक्शन इफेक्ट्सवरच सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.

आत्तापर्यंत शाहरूख खानचा रा.वन हा सिनेमा बॉलिवूडमधील आत्तापर्यंतचा सर्वाधिक महागडा सिनेमा होता. रा.वनमधील स्पेशल इफेक्ट्सवर ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, हा सिनेमा शाहरुख खानने आपल्याच कंपनीद्वारे बनवला होता, यामुळे या सिनेमाचा खर्च काही प्रमाणात कमी झाला. रा.वन सिनेमापासून बॉलिवूडमध्ये महागड्या सिनेमांचा नवा ट्रेंड सुरू झाला.

रा.वन बनवण्यासाठी आत्तापर्यंत१२० कोटी रुपये खर्च आला होता. मिलन लुथरियाद्वारा दिग्दर्शित होणाऱ्या बालाजी टेलिफिल्म्सच्या वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई अगेन या सिनेमाचं बजेटही ८० कोटीहून जास्त आहे. या सिनेमात अक्षय कुमार, इम्रान हाश्मी हे कलाकार काम करत आहेत. रजनीकांत यांचा एथिरन (रोबोट) हा भारतातील आत्तापर्यंतचा सर्वांत महागडा सिनेमा मानला जातो. या सिनेमाचं बजेट १६५ कोटी रुपये होतं, असं सांगण्यात येतं.  शेरखानचं बजेट रोबोटपेक्षाही अधिक असेल का हे लवकरच कळेल.