शाहरुखला जयपूर कोर्टाची नोटीस

जयपूरमध्ये सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएल पाचच्या सिझनमधील सामना सुरू असताना चक्क शाहरूख खान सिगरेट ओढत होता. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर शाहरुखला जयपूर कोर्टाने नोटीस बजावली आहे. त्यानुसार शाहरूखला २६ मे रोजी उपस्थित राहावे लागणार आहे.

Updated: Apr 27, 2012, 11:21 AM IST

www.24taas.com, जयपूर

 

 

जयपूरमध्ये सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएल पाचच्या सिझनमधील सामना सुरू असताना चक्क शाहरूख खान सिगरेट ओढत होता. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर शाहरुखला जयपूर कोर्टाने  नोटीस बजावली आहे. त्यानुसार शाहरूखला २६ मे रोजी उपस्थित राहावे लागणार आहे.

 

 

८ ए्प्रिल २०१२ रोजी आयपीएल पाचचा सिझन रंगात आला असताना  कोलकाता टीमचा मालक आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरूख  जयपूरमध्ये सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना सुरू असताना चक्क  सिगरेट ओढत होता. मात्र, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी असताना शाहरूखने याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे  जयपूर कोर्टाने नोटीस बजावली आहे.

 

 

राजस्थान सरकाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी केली आहे. ही बंदी १२ वर्षांपासून सुरू आहे. या बंदीचे शाहरूखने उल्लंघन केले आहे. याबाबतची दृश्ये दूरचित्रवाणीवरूनही दाखविण्यात आली आहेत. धुम्रपान करण्यावर बंदी असताना शाहरूखने याचे उल्लंघन  केल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. दरम्यान, तक्रारीनंतर धुम्रपान करण्यावर बंदी असताना शाहरूखने याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे याबाबतची सुनावणी १२ एप्रिलला होणार होती. ती होवू शकलेले नाही. आज जयपूर कोर्टाने आज समन्स जारी केले.

 

 

 संबंधित बातमी

 

 

बॉलिवूडचा किंग खान अडचणीत

आयपीएल पाचचा सिझन रंगात आला असताना नवा वाद कोलकाता टीमचा मालक आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याच्यामुळे निर्माण झाला आहे. जयपूरमध्ये सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना सुरू असताना चक्क शाहरूख खान सिगरेट ओढत होता. मात्र, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी असताना शाहरूखने याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे याबाबतची सुनावणी आज १२ एप्रिलला होणार आहे.
.
---------------------------------

शाहरुख खानची अमेरिकेत चौकशी

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला न्यूयॉर्क इमिग्रेशननं चौकशीसाठी दोन तास ताब्यात घेतल्याची घटना समोर आलीय. शाहरूख अमेरिकेतल्या येल युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेलाय. मात्र येलला जाण्यापूर्वीच त्याला न्यूयॉर्क विमानतळावर रोखण्यात आलं आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली.